संतोष पोळशी संबंधित आणखी दोन जण बेपत्ता

August 17, 2016 4:01 PM0 commentsViews:

Santosh Pol231

17 ऑगस्ट :   सातार्‍यातल्या डॉक्टर संतोष पोळनं घडवलेल्या हत्याकांडप्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष पोळ याच्याशी संबंधित आणखी 2 जण बेपत्ता असल्याची तक्रार वाई पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

मेणवली गावातले संतोष गावंडे हे 2010 पासून बेपत्ता आहेत. तर आसरे गावातल्या दीपाली सणस या 2002पासून बेपत्ता आहेत. संतोष गावंडे हे डॉक्टर पोळकडे उपचार घेत होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. संतोषशी संबंधित बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार करावी, असं आवाहन आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर दोन तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close