सामूहिक बलात्कार आणि दुहेरी खुनाबद्दल बीडमधल्या दोघांना फाशी

August 17, 2016 9:52 PM0 commentsViews:

rape_634565

17 ऑगस्ट : बीड जिल्ह्यातल्या माजलगाव अतिरिक्त आणि सत्र न्यायालयानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि दुहेरी खून प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 28 मे 2015 या दिवशी हा गुन्हा घडला होता.

बीड जिल्ह्यातल्या चोरंबा इथं कृष्णा रामराव रिड्डी आणि अच्युत उर्फ बाप्पा उर्फ बाबू कचरू चुंचे या दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर आळीपाळीनं बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या मुलीचा आणि तिच्या आईचा गळा दाबून खून केला होता. 15 महिन्यांमध्ये पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर न्यायालयानं आज (बुधवारी) निकाल दिला.

या गुन्ह्यात सरकारी पक्षातर्फे 13 साक्षीदारांच्या साक्षी तसापसण्यात आल्या. या निकालामुळे मृत मुलीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close