हिंदूंच्या सणांमध्येच दरवेळी आडकाठी का? – राज ठाकरे

August 18, 2016 1:30 PM0 commentsViews:

Raj thackray

18ऑगस्ट : हिंदूंच्या सणांमध्येच दरवेळी आडकाठी का? मोहरमच्या मिरवणुकीवर बंदी घालायला घाबरता का?, दहीहंडीचे नियम ठरवण्याचा अधिकार कोर्टाला कुणी दिला?, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरूवारी) व्यक्त केला.

दहीहंडीत चालणारा धिंगाणा, त्यावर होणारी पैशाची उधळपट्टी, या खेळाचं बाजारीकरण थांबायलाच हवं; पण दहीहंडीची उंची 20 फूटच हवी, हे निर्बंध कशासाठी? आता काय स्टुलावर उभं राहून हंडी फोडायची का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. दही हंडीच्या थरांवर आणलेल्या मर्यादेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

हिंदूंच्या सणांमध्येच दरवेळी आडकाठी का? मोहरमच्या मिरवणुकीवर बंदी घालायला घाबरता का?, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक गोष्टीत कोर्ट निर्णय सांगणार असतील तर सरकारची काय गरज आहे. संपूर्ण देश कोर्टानेच चालवावा. त्यांनी स्वतंत्र निवडणूका लढवावी, अशी खोचक टीका राज यांनी केली.

हिंदू लोक शांत बसतात म्हणून याचा फायदा घेतला जात आहे. कोर्टाने डोकं ठिकाणावर ठेवून निकाल दिले पाहिजे. अपघात होतात म्हणून दहीहंडी बंद करण्याच्या न्यायानं हायवेही बंद करावे लागतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्य सरकारच उदासिन असल्यामुळे कोर्ट असे निर्बंध लाधत आहेत. सर्व प्रकाराला राज्य सरकारच कारणीभूत आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close