मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, पाच जणं जागीच ठार

August 18, 2016 1:09 PM0 commentsViews:

mum accident213

18 ऑगस्ट : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आज (गुरूवारी) पहाटे एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजण जागीच ठार झालेत.

एक्स्प्रेस हायवेवरील मिलन सबवेजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त होंडा सिटी कार रस्त्यावरून खूप वेगात जात होती. मात्र, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट एका झाडावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी सगळेजण 19 ते 25 या वयोगटातले असून अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही.

दरम्यान, गाडीचा वेग पाहता पोलिसांकडून गाडीतील लोकांनी दारू प्यायली होती का, याची चौकशी केली जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा