भारताची ‘सुल्तान’ साक्षी मलिकचा खडतर प्रवास

August 18, 2016 6:31 PM0 commentsViews:

शिल्पा गाड, मुंबई

18 ऑगस्ट :  रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देत साक्षी मलिकने इतिहास रचला. मात्र साक्षीने मिळवलेले हे यश तिच्या 12 वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील मोखरा गावात राहणारी साक्षी वयाच्या बाराव्या वर्षीच कुस्तीच्या आखाड्यात उतरली आणि यंदा ऑलिम्पिकच्या 12व्या दिवशी तिची स्वप्नपूर्ती झाली. फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात भारताला पहिलेवहिले पदक मिळवून देणार्‍या साक्षीच्या कुस्तीतील प्रवासाचा हा आढावा…

Sakshi new

ऑलिंपिक जिंकायला एक वेगलीच मानसिकता लागते. शेवटपर्यंत झुंंज देण्याची, जिंकणं हा हक्कचं आहे अशा मानसिकतेची, मग ती कुस्तीची मॅच असो किंवा हँडबॉलचा सामना. कधी ही लढत थेट मारामारीपर्यंत पोहोचते, आपल्याला जाणवतही नाही आणि फरकही पडत नाही. कारण कुस्ती हा खेळच आक्रमक हाच धागा आहे. हँडबॉल आणि कुस्तीत हा समान दुवा आहे, असं साक्षीचे कोच सांगतात.

साक्षीकडे हाच किलर इन्स्टिंक्ट आहे आणि आजच्या मॅचनं तिने हे सर्वत: सिद्ध केलं. विजय मिळवला तोही 0- 5 अशी सामन्याची स्थिती असताना. साक्षीचा हा पहिलाच ऑलिंपिक प्रवास. पण तिचं मूळचं स्वप्न हे वेगळंच होतं. आणि साक्षीचं विमान उडालं ते थेट रिओसाठी. कुस्तीपटू होण्याचं साक्षीन ठरवलं ते वर्तमानपत्रातली बातमी वाचून. निग्रही, फोकस्ड आणि हेच करायचं अशी प्रबल इच्छा.

साक्षी आणि तीची जिवलग मैत्रीण विनेश फोगट यांनी हे स्वप्न पाहिलं. खरतर, भारतात महिला कुस्तीपटूंचं करिअर , पुरुषांच्या कुस्तीच्या तुलनेत फारच मागास. भविष्याची काहीच शाश्वती नसलेलं. साक्षीचे वडील सुखबीर मलिक मलिक दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये (डीटीसी) कंडक्टरची नोकरी करतात. तर आई सुदेश मलिक या रोहतक येथे अंगणवाडी सुपरवाझर आहेत. सुरवातीला हा खेळ नको असं त्यांचं म्हणणं होतं. पण साक्षी हट्टालाच पेटली. रोहतकमध्येही आणि इथे रिओतही “तुझे लढना है”, हे साक्षीचं म्हणणं तमाम भारतीय स्त्रीयांना लागू होणारं आहे. आपापल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रात संकटांशी सामना करत पुढे जाणार्‍या प्रत्येक स्त्रीशी जोडलं जाणारं, स्वयंसिद्ध बनवणारं साक्षीला तिच्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा !


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close