भारताला ‘सूवर्ण’संधी, पी.सिंधूची फायनलमध्ये धडक

August 18, 2016 9:25 PM0 commentsViews:

PV SINDHI12

18 ऑगस्ट : भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली असून सिल्व्हर मेडलवर आपलं नाव कोरलं आहे. सिंधुने ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये जापानची प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराचा 2-0 ने पराभव करत फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. सिंधू ज्या आक्रमक पद्धतीने खेळतेय ते पाहिलं तर पी. व्ही. सिंधूकडून सगळ्यांनाच गोल्ड मेडलची अपेक्षा आहे.

सिंधुने पहिल्या फेरीत 21-19 ने विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत सिंधुने सामन्यावर पकड मजबूत केली. दुसर्‍या फेरीतही सिंधुने आघाडी घेत 21-10 नं सामना जिंकला. सामन्यात विजय मिळवल्याने सिंधुने अंतिम फेरी प्रवेश केला आहे. आता उद्या तिची फायनल मॅच आहे. या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close