धडाकेबाज सिंधूच्या प्रवासावर एक नजर

August 19, 2016 4:44 PM0 commentsViews:

19 ऑगस्ट :  बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर आहे. कारण रिओ ऑलंपिकच्या फायनलमध्ये सिंधूनं धडक मारली आहे. तिच्या कामगिरीमुळे एक मेडल तर पक्कं झालं आहे पण, भारताला ती गोल्ड मेडल मिळवून देणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Rio Olympics Badminton Women

सिंधू हा शब्द माहित नसलेला आपल्याला क्वचितच एखादा सापडेल कारण सिंधू हा शब्द राष्ट्रगीताचा अविभाज्य भाग आहे. तेच नाव धारण करणारी पीव्ही सिंधूही आता देशाच्या क्रीडा इतिहासाची अविभाज्य भाग होते आहे. कारण रिओ ऑलंपिकमध्ये तिनं एक मेडल तर पक्कं केल आहे. पण उत्सुकता आहे ते ती सिंधू गोल्ड मेडल मिळवून देणार का याची. कारण रिओच्या फायनलमध्ये सिंधूची गाठ पडली आहे, ती स्पेनच्या वर्ल्ड नंबर वन कॅरोलिना मारीनशी विशेष म्हणजे गेल्या वर्षी सिंधूनं डेन्मार्क ओपनमध्ये मारीनला पराभूत केलं होतं.

भारतात बॅडमिंटन म्हटलं की सायना नेहवालचं नाव चटकन लोकांच्या लक्षात येतं. रिओला टीम्स रवाना झाल्या त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष होतं ते सायनावरच पण, तिनं निराशा केली. त्याच्या तुलनेत सिंधूनं मात्र पहिल्या राऊंडपासून दमदार खेळ करत आशा जीवंत ठेवल्या आहेत. फायनलमध्ये धडक मारेपर्यंत सिंधू जवळपास वर्ल्ड रँकींगमध्ये पहिल्या टॉप टेनमध्ये असलेल्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यात सेमी फायनलमध्ये पराभूत केलेल्या नोझोमी ओकुहाराचाही समावेश आहे.

सायना तर देशाच्या बॅडमिंटनची ओळख आहेच पण त्यात सिंधूशी आता तिला स्पर्धा करावी लागेल. कारण रिओ ऑलंपिकमध्ये जे सिंधूनं करून दाखवल, ते सायनालाही जमलेलं नाही. विशेष म्हणजे सिंधूनं 2012 च्या लंडन ऑलंपिकची गोल्ड मेडलिस्ट असलेल्या चायनीज खेळाडूचाही पराभव केलेला आहे. सिंधू सरप्राईज देण्यात माहीर आहे. चायनिज, जापनिज, कोरीयन खेळाडूंची उंची कमी असल्यानं बॅडमिंटनवर त्यांची हुकूमत आहे. पण चांगली साडे पाच फुटाकडे उंची असलेली सिंधू आता बॅडमिंटनवर राज्य करेन असं दिसत आहे. सायनाला सुरुवातीला कोचिंग दिलं ते गोपीचंद यांनीच. त्यानंतर दोघांत मतभेद झाले आणि सायना बाहेर पडली. नंतर गोपीचंद यांनी सगळी मेहनत लावली ती सिंधूवर. सिंधूनेही तो विश्वास सार्थ ठरवत यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे. 56 किलो मीटरचा डेली प्रवास करून सिंधूनं प्रॅक्टीससाठी कधीही वेळ चुकवली नाही यातच तिची खेळाबाबतची कमिटमेंट दिसते असं गोपीचंद म्हणाले. विशेष म्हणजे सिंधूचे आईवडील हे प्रोफेशनल व्हॉलीबॉलपटू आहेत. त्यांनीही देशाचं नेतृत्व केलेलं आहे. सिंधूचे वडील रामण्णांना तर अर्जून पुरस्कारही मिळालेला आहे. आता राष्ट्रगीत म्हणताना सिंधू शब्द आला की भारतीयांच्या डोळ्यासमोर उभी राहील ती त्यांचीच कन्या बॅडमिंटनपटू सिंधू.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close