उस्मानाबादमध्ये रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांमुळे गर्भातचं दगावलं बाळ

August 19, 2016 6:13 PM0 commentsViews:

khadde1

19 ऑगस्ट : राज्यभरातील खड्‌ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच असून याच खड्‌ड्यांमुळे एका महिलेला आपले बाळ गमवावं लागल्याची अतिशय दु:खद आणि धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळेच आपल्या बाळाला गमवावं लागल्याचं महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. सध्या या महिलेवर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे.

उस्मानाबादमध्ये पीडित महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या आणि तीचे नातेवाईक तीला दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्‌ड्यावर गाडी उसळली आणि महिलेला आपलं बाळ गमवावं लागलं, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातल्या बोरवंटी ते मंगरुळु पाटी दरम्यान 4 किमीचा रस्ता गेल्या 25 वर्षांपासून दुर्लक्षीत आहे. रस्त्यांवरील खड्‌ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुंबईसह राज्यभर रस्त्यांवरील खड्‌ड्यांनं नागरिक हैराण झाले आहे. खड्‌ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र प्रशासनाच्या या हलगर्जी कारभारामुळं एका निष्पापाचा बळी गेला आहे. त्यामुळे अजून किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असा प्रश्न इथे उपस्थित होतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close