राजीव गांधी पुरस्काराच्या नावाने गैरव्यवहार

April 13, 2010 1:37 PM0 commentsViews: 5

13 एप्रिलकाँग्रेस पुरस्कृत राजीव गांधी पुरस्काराच्या नावाने मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला. मोठ्या खाजगी कंपन्यांकडून काँग्रेसच्या नावावर देणग्या घ्यायच्या आणि हे पैसे रंगारंग अवॉर्ड कार्यक्रमात सहभागी होणार्‍या नटनट्यांना वाटायचे, असा संशयास्पद व्यवहार या समितीमार्फत चालतो.त्यामुळे या पुरस्कार समितीच्या बँक खात्याच्या चौकशीची मागणीही खडसे यांनी केली. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेत असलेल्या या समितीच्या खात्यात सुझलॉन कंपनीने 40 लाख रूपये, हॉटेल लीला व्हेंचरने 37 लाख रूपये, इंडिया बुलने 1 कोटी रुपये, भेलने 20 लाख रूपये, जीव्हीकेने 25 लाख, तर डी. बी. रियल्टी या कंपनीने 75 लाख रूपयांच्या देणग्या जमा केल्या आहेत.तर या समितीने आतापर्यंत करीना कपूरला 35 लाख रूपये, हृतिक रोशनला दीड कोटी, प्रियांका चोप्राला 40 लाख, सलमान खानला 80 लाख आणि सोहेल खानला 25 लाख रुपये दिलेत, अशी माहितीही खडसे यांनी दिली.

close