डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: तीन वर्षं उलटूनही मारेकरी मोकाटच

August 20, 2016 1:32 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे
19 ऑगस्ट :  अंनिसचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. तीन वर्षात या हत्येच्या अनेक चर्चा झाल्या पण आतापर्यंत या हत्येप्रकरणी फक्त डॉकटर वीरेंद्र तावडेला झाली आहे. त्याला हि तीन महिने होत आलेत. न्यायालयाने अनेक कोरडे तपासावर ताशेरे ओढलेत पण तरीही तपास पुढे सरकायला तयार नाही. त्यामुळं दाभोलकर कुटुंबीय, अनिस आणि सामाजिक कार्यकर्ते आजही नाराज आहेत.

narendra dabholkar2133421

गेले 36 महिने प्रत्येक 20 तारखेला महर्षी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध तपास वेगवान करण्यासाठी अनेक कार्यकर्ते नियमित येतात. आतापर्यंत तपास यंत्रणांनी या प्रकरणात वीरेंद्र तावडे याला अटक केली आहे. त्यालाही आता तीन महिने झालेत. मात्र पुढं प्रगती ठप्प आहे. हत्येचे मुख्यसूत्रधार आजही मोकाट आहेत. तीन वर्षांनंतर हि हत्येचा उलगडा होत नाही याची मोठी वेदना अंनिसला आहे .

मागील तीन वर्षात खुनाच्या तपासात पुणे पोलिसांनी मनीष नागोरी खंडेलवाल याला अटक करून सोडून देणं आणि सीबीआय ने वीरेंद्र तावडे ला अटक करणं या पलीकडे दुसरं काहीही घडलेलं नाही. जी अवस्था नागोरी आणि खंडेलवाल यांच्या अटकेनंतर झाली ती सीबीआय तपासात वीरेंद्र तावडे बाबत होईल कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि हीच संधी घेऊन सनातन ने आता सीबीआयवर आगपाखड करत तावडे याला केलेली अटक चुकीची असल्याचा धोशा सनातन संस्थेने लावला आहे.

तपासाची ही अवस्था आणि तपास यंत्रणांनाही केलेली ढिलाई, न्यायालयाचे ताशेरे या सगळ्या गोष्टींमुळे याप्रकरणात केवळ वेळ काढूपणा होतोय का असे ताशेरे खुद्द तपासावर नजर ठेऊन असलेल्या उच्चं न्यायालयाने विचारलं आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंतांची मोठी खाण होती मात्र ज्या पद्धतीने त्यांच्या हत्या होताहेत आणि त्यांच्या तपासाची अवस्था जी होतेय ते पाहता सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता तरी डॉक्टरांच्या हत्येचा तपास लागेल अशी अपेक्षा करण्याशिवाय आपल्या कुणाच्याही हातात आणखी काहीच नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close