आज दाभोलकर जिवंत असते तर जेलमध्ये टाकलं असतं, अभय वर्तक यांचं वक्तव्य

August 20, 2016 12:48 PM0 commentsViews:

19 ऑगस्ट : डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला (आज) शनिवारी तीन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ओंकारेश्वर पुलावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तर अंनिसने काढलेल्या मोर्चेला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘सनातन’ संस्थेने देखील मोर्चा काढला आहे. यावेळी बोलताना अभय वर्तक यांनी अंनिस आणि पुरोगामींकडून सनातनची बदनामी केली जात असल्याच्या आरोप करत, आज जर दाभोलकर जीवंत असते तर त्यांना जेलमध्ये टाकलं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

ABHAY VARTAK

दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पुर्ण होऊनदेखील तपासाची चक्र अजूनही संथ असून आरोपी मोकाट असल्याचा निषेध करत यावेळी अंनिसतर्फ मोर्चा काढण्यात आला. अंनिसने काढलेल्या निषेध मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकर, बाबा आढाव, अतुल पेठे, संध्या गोखले, मुक्ता दाभोलकर उपस्थित होते. तर दुसरीकडे सनातन संस्थेनेदेखील मोर्चा काढत अंनिसवर सनातनची बदनामी करत असल्याचा आरोप केला. महाराणा प्रताप उद्यान ते कसबा गणपपतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा विरेंद्र तावडे आणि कमलेश तिवारी यांचे फलकही वापरण्यात आले. एवढचं नाही तर ‘आम्ही सारे दाभोलकर’ प्रमाणे ‘आम्ही सारे सनातन’च्या आशा घोषणाही यावेळी सनातनकडून देण्यात आल्या. दरम्यान, काही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काही काळ सनातनचा मोर्चा रोखून धरला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close