गणपतीची वर्गणी न दिल्यामुळे दुकानदारांना काढायला लावल्या उठाबशा

August 20, 2016 4:04 PM0 commentsViews:

20 ऑगस्ट :  दुकानातले मालक नसल्यामुळे गणपती मंडळाला वर्गणी द्यायला नकार देणार्‍या कर्मचार्‍या चक्क उठबशा करायला लावल्याचा प्रकार पिंपरीत घडला आहे. उठाबाश काढत असतानाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

Pune shiksha231

पिंपरीतल्या भोसरी परिसरात क्राऊन बेकरी या दुकानात दुपारच्या वेळी एका कामगाराने गणपती मंडळाला वर्गणी द्यायला नकार दिला. याचा राग आल्यामुळे या दुकानातील सर्व कर्मचार्‍यांना दमदाटीनं उठाबशा काढण्याची शिक्षा या गणेश मंडळातल्या कार्यकर्त्यांनी दिली. बरं, बेकरीतील कर्मचार्‍यांना रस्त्यावर उठाबशा काढायला लावाणार्‍या कार्यकर्त्यांचा आवेश बघता कुणीही त्यांना रोखण्यासाठी पुढे आलं नाही. इतकंच नाही तर त्यांचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा प्रकारही या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नसून, या कर्मचार्‍यांनीच स्थानिक गणेशोत्सवावर टीका केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं होतं. मात्र आता या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close