पुणे स्फोटाबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ

April 13, 2010 2:25 PM0 commentsViews: 5

13 एप्रिलपुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली होती. ही मदत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केली होती. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारकडे 15 फेब्रुवारीला पत्र लिहून मृतांची आणि जखमींची यादी मागवली होती. या माहितीसाठी 25 फेब्रुवारी आणि 25 मार्चला पुन्हा दोन स्मरणपत्रेही पंतप्रधान कार्यालयाने मुख्य सचिवांना पाठवली होती. पण तरीही संबंधित माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आलेली नाही, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. यावर ही बाब गंभीर असून त्याची दखल घेतली जाईल, असे निवेदन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिले.

close