‘एम एस धोनी’च्या मराठी भाषांतराला मनसेचा विरोध

August 20, 2016 5:24 PM0 commentsViews:

M.S.-Dhoni-The-Untold-Story-Telugu-Trailer

20 ऑगस्ट :  कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एम.एस. धोनी, द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाला मराठी भाषेत प्रदर्शित करण्यासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ जोरदार विरोध दर्शवला आहे. हिंदी चित्रपट मराठीत डब केल्यास चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा मनसेने घेतला आहे.

मराठीत अन्य भाषेचे चित्रपट येत असल्याने मराठीला मोठ्या स्पर्धेला सामना करावा लागत आहे. आम्हाला धोनीच्या चित्रपटाला विरोध नाही. मराठी माणसं हिंदीतील चित्रपट पाहायला जातच असतात. त्यामुळे हिंदी चित्रपट मराठीत डब करायला नको. मराठीला प्राईम शो मिळायला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, यामुळेच आमचा विरोध आहे, अशी माहिती मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली.

धोनीचे चाहते देशभर असल्याने एम. एस. धोनी हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मराठी आणि तमिळमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच मनसेचा विरोध होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा