जळगावात पारा 46.6 वर

April 13, 2010 3:05 PM0 commentsViews: 6

13 एप्रिलआज राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली. इथे पारा तब्बल 46.6 अंश सेल्सियसवर पोहोचला. प्रशासनाने आता यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा हा पिण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे.उन्हामुळे दुपारी रस्ते ओस पडत आहेत. सकाळ, संध्याकाळीही उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी लोक डोक्याला रुमाल बांधून, टोप्या, सनकोट घालून फिरत आहेत. उसाच्या रस थंडपेयांची विक्री वाढली आहे. विदर्भ तापलेविदर्भात नागपूर आणि वर्धा चांगलेच तापले आहे. नागपूर शहरात उष्माघाताने दोन लोकांचा मृत्यू झाला. यात सक्करदरा भागातील एक 45 वर्षीय इसम तसेच इमामवाडा इथे राहणारे 70 वर्षांचे सुरेश भगत यांचा समावेश आहे. वर्ध्यात आज 44.5. तर नागपूरमध्ये 44.4 एवढे तापमान नोंदवले गेले. सकाळी नऊ नंतर उन्हाला सुरूवात होते. तर संध्याकाळी सातपर्यंत वातावरण तापलेलेच असते.

close