रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती

August 20, 2016 7:26 PM1 commentViews:

urjit patel GK

20 ऑगस्ट : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही नियुक्ती केली आहे.

सध्याचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या पदाचा कार्यकाल येत्या 3 सप्टेंबरला संपत असल्याने त्यांच्या जागी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांचे मॅनेजमेंट, आरटीआय क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी या क्षेत्रातून विविध निर्णय घेऊन आपले कार्य समर्पकपणे पुढे नेले.

गर्व्हनरपदासाठी सुरुवातीला भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. त्यानंतर अचानकपणे पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मध्यंतरी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि रघुराम राजन यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला होता. त्यानंतर राजन यांनी आपण दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी पटेल यांची गर्व्हनरपदावर नियुक्ती केली आहे.

कोण आहेत उर्जित पटेल?

- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बी.ए.
– ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून एम.फिल.
– येल यूनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट
– 1990-95 : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत डेप्युटेशनवर
– 1998-2001 : भारत सरकारसाठी कंसल्टंट म्हणून काम
– 2000-2004 : अर्थ मंत्रालयाच्या अनेक समित्यांमध्ये सदस्य
– जानेवारी 2013 : रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Satish Bhangaonkar

    From Mr Patel lot of exception is made from all over India. But he can not change it overnight.If he not able to able to change in shot time . leaders will start blaming him. This what is happening in India.

close