10 पेक्षा जास्त जाती विकसित करणारा ‘राईस मॅन’ आजही उपेक्षितच

August 20, 2016 8:58 PM0 commentsViews:

महेश तिवारी, चंद्रपुर

20 ऑगस्ट : चंद्रपूरचे राईसमॅन अर्थात दादाजी खोब्रागडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करुन दाखविली आहे. या अवलियाने एचएमटी तांदळाच्या तब्बल 10 जाती विकसित केल्या आहे. या संशोधनासाठी त्यांना शंभराच्यावर पुरस्कार देखील मिळाले आहेत पण, चंद्रपूरच्या मातीतला कृषी संशोधक आजही उपेक्षिताचेच जीणं जगतो आहे.

rice man

घरच्या 2 एकर शेतीत एचएमटी तांदळाचे तब्बल 10 वान विकसित करुन दादाजी खोब्रागडे आता पुरते थकले आहेत. तरीही त्यांची शेतावरची चक्कर काही चुकत नाही. 1982 मध्ये दादाजींनी विकसित केलेला एचएमटी हा वाण आज सर्वदूर प्रसिद्ध पावला आहे. दादाजींनी फक्त एचएमटी सोनाच नाही तर, नांदेड 92, नांदेड हिरा, विजय नांदेड, दिपक रत्न असे 10 वान नव्याने शोधून काढले आणि विकसितही केले. एचएमटी ही तांदळाची जात पारंपारीक तांदळापेक्षा 80 टक्के जास्त उत्पादन देते. त्यांच्या याच एचएमटी वानाचं पाच राज्यात एक लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रात भरघोस पीक घेतलं जातं. पण दादाजी मात्र, आहे तिथंच आहेत. एवढ्या अनमोल संशोधनाचा त्यांचा काहीच आर्थिक फायदा झालेला नाही.

दादांजी या संशोधनाबद्दल कृषीभूषण सह तब्बल 100च्यावर पुरस्कारही मिळाले. मान – सन्मानही मिळाला पण, त्यांचं नशीब फुटकं निघालं. त्यांना सरकारनं दिलेलं रजत पदकच खोटं निघालं. त्याच्या बातम्याही झाल्या पण, पुढे काहीच झाले नाही. म्हणायला त्यांनी शोधून काढलेल्या तांदळाच्या वानावर मात्र कंपन्यांनी बक्कळ पैसे कमावले. दादांजींनी शोधून काढलेली वान विविध कंपन्यांकडून आजही डुल्पिकेट नावाने आजही विकले जात असल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. दादाजी खोब्रागडेंच्या जीवनात पुरस्काराच्या पलीकडे फारसं काहीच पदरात पडलेले नाही म्हणूनच, सरकारने तरी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी नांदेडवासी करत आहे. दादाजींची प्रकृती अस्वस्थ असली तरी त्यांची संशोधक वृत्ती त्यांना स्वस्थ बसु देत नाही शंभराच्यावर पुरस्कार पटकावणा-या दादाजींना तांदळाच्या जातींवर आणखी संशोधन करायचं आहे. पण सरकार आणि कृषी विद्यापीठांची साथ मिळत नसल्याची त्यांची खंत आहे. म्हणूनच ही दादाजींची बातमी बघून तरी सरकार त्यांच्या कार्याची दखल घेईल अशी आशा करूया.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close