‘प्रोडुनोव्हा गर्ल’चं भारतात आगमन

August 20, 2016 9:24 PM0 commentsViews:

20 ऑगस्ट :  ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवणारी दीपा कर्माकर आज (शनिवारी) सकाळी भारतात परतली. यावेळी आगरतळा विमानतळावर दिपाचे स्वागत करण्यासाठी हजारो क्रीडाप्रेमींची गर्दी जमली होती.

दिपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्या स्वागतासाठी राज्यातील क्रीडा पदाधिकारीदेखील जातीने हजर होते.

यावेळी दीपाने म्हटले की, आता पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करणार असून भारताला पदक मिळवून देणंच माझं लक्ष्य असेल. मी आठवडाभरासाठी माझ्या आई-वडिलांसोबत राहणार असून आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणार असल्याचे दीपाने सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close