गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून माजी सरपंचाची हत्या

April 13, 2010 3:18 PM0 commentsViews: 1

13 एप्रिलगडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील पुसूकपल्ली येथील माजी सरपंचांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. मल्ल्या गावडे असे त्यांचे नाव आहे. 100हून अधिक नक्षलवाद्यांनी पुसूकपल्ली इथे गावडे यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला केला. यानंतर नक्षलवाद्यांनी गावात एक चिठ्ठी टाकली. त्यात गावडे हे पोलिसांना मदत करत असल्याने त्यांची हत्या केल्याचे म्हटले आहे. 22 मार्चला नक्षलवाद्यांनी या परिसरातच एका माजी नक्षलवाद्याची हत्या केली होती. 25 एप्रिलला जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

close