हैदराबादेत ‘सिंधू’त्सव; गछिबोवली मैदानावर सन्मान सोहळा

August 22, 2016 1:47 PM0 commentsViews:

22 ऑगस्ट :   रिओ ऑलिम्पिक 2016चा दिमाखदार सांगता समारंभ पार पडल्यानंतर काही तासांतच देशाची मान अभिमानानं उचावणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं भारतात आगमन झाले असून, तिचे हैदराबादच्या विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विमानतळावर दाखल झालेल्या सिंधूचं स्वागत करताना पारंपारिक वाद्य आणि नृत्यप्रकार सादर करून सिंधूला खास मानवंदना देण्यात आली. भारतासाठी रौप्य जिंकल्याचं पूर्ण समाधान आणि मायदेशात परतण्याचा आनंद सिंधूच्या हासर्‍या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.

Pusarla Sindhu

ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिल्याने देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. सिंधूच्या स्वागतासाठी तब्बल 1600 किलोमीटर प्रवास करत मुंबईची डबलडेकर ‘निलांबरी’ बस हैदराबादमध्ये दाखल झाली आहे. सिंधूचं स्वागत करण्यासाठी मिरवणुकीत हजारो नागरिक उपस्थित झाले होते. निलांबरी बसमध्ये सिंधूसोबत तिचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद हेही उपस्थित होते. त्यांचंही जंगी स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, हैदराबाद इथल्या गधिबोवली मैदानावर सिंधूचे सन्मान सोहळ्याचे कार्यक्रम होणार आहे. तेलंगणा सरकारच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तिचे असंख्य चाहतेही या मैदानात वाट पाहत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा