पालघरमध्ये 2 बोटी बुडाल्या, 15 मच्छीमार सुखरूप

August 22, 2016 2:55 PM0 commentsViews:

Boat sink

22 ऑगस्ट :  पालघर जवळच्या डहाणू इथल्या समुद्रात 2 मच्छीमार बोटी बुडाल्या असून या बोटींवरील 15 ते 20 मच्छीमारांना वाचवण्यात यश आलं आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांच्या प्रसंगावधानामुळे दोन्ही बोटींमधील मच्छीमारांना जीवनदान मिळालं.

हिमसागर आणि कृष्णसागर असं डहाणू इथल्या समुद्रात बुडालेल्या बोटींची नावं होती. याबाबत माहिती मिळताच नौदल आणि तटरक्षक दलाने स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. मात्र, स्थानिक मच्छीमारांनी मोठं धाडस दाखवत बुडालेल्या बोटींमधील सर्व 15 मच्छीमारांना सुखरूप किनार्‍यावर आणलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close