महाशीर मासा आढळला तरचं नदी गंगा स्वच्छ!

August 22, 2016 4:14 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे-ढोके, लोणावळा

22 ऑगस्ट :   गंगा नदी स्वच्छ झाली असं ठामपणे सांगायचं असेल तर गोड्या पाण्याचा राजा गंगेत सापडायला हवा. हिमालयात, सह्याद्री पर्वतात उगम पावणार्‍या नदीमध्ये सापडला जाणारा हा किंग म्हणजेच महाशीर मासा. गळानं मासे पकडण्याच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेला हा मासा गळाला लागेनासा झाला आहे. जगात सापडल्या जाणार्‍या 20 महाकाय माशांपैकी एक असा हा मासा आता लोप पावत चालला आहे.

ÃÖÖê¯ÖÖêßê¯ÖÝÖ ÃÖÖêêÖê

महाशीर… म्हणजे मोठ्या डोक्याचा असं कुणी म्हणतं किंवा या माशाच्या 45 जाती म्हणून महाशीर म्हणतं. तर गोड्या पाण्यातल्या माशांपैकी सगळ्यात मोठी म्हणजे 9 फुटांपर्यंत वाढणारी जात म्हणजे महाशीर. संस्कृत, इंडो पर्शियन असे वेगवेगळे नावांचे त्याला संदर्भ आहेत. पण सगळ्या संदर्भात त्याची एक कणखर, दणकट आणि मोठा मासा अशी एकसमान वैशिष्ट्ये मात्र यात दिसतात. हा मासा म्हणे आपल्या पिलांसाठी डोंगर चढून वर जातो.

अँग्लिंगच्या या गेममध्ये महाशीर आपल्या गळाला लागावा म्हणून अनेकजण तासन्‌तास वाट पाहतात. कारण गोड्या पाण्याचा हा राजा इतकी तगडा मुकाबला करतो की हा खेळ खेळणार्‍यालाही मजा वाटते. गळ लावून मासा पकडायचा आणि किती किलोचा किंवा कोणत्या जातीचा आहे हे पाहून तो सोडायचा. या माशासाठी अनेक परदेशी अँग्लर्स भारतात येतात. पण भारतातली मासेमारी इतकी अनैसर्गिक होते की, हा मासा आता दिसेनासा झाला आहे.

45 जातींपैकी 15 जाती एकट्या भारतात सापडतात. इंद्रायणीकाठीही तो मोठ्या प्रमाणावर सापडायचा त्याचं वैशिष्ट्‌य म्हणजे तोंडाजवळ असणारा हा कल्ला. यामुळे तो नथवाला मासा म्हणूनही ओळखला जायचा. महाशीरची गोल्डन महाशीर ही जात सगळ्यात मोठी मानली जाते आणि म्हणजे खेळायचे पत्ते पण यापासून बनवले गेले होते. 1822 मध्ये बुचनान हॅमिल्टनमध्ये पहिल्यांदा महाशीर विषयी शास्त्रीयदृष्ट्या वर्णन केलं आणि 1833 मध्ये पहिल्यांदा ओरीएन्टल स्पोटीर्ंग मॅगझिनमध्ये याचा अँंग्ललर्स चॅलेंज म्हणून उल्लेख झाला.

भारतात, टाटा पॉवर या महाशीरला वाचवायचा प्रयत्न करतेय. त्यासाठी 1975 पासून आतापर्यंत जवळपास 16 लाख माशांची पैदास करण्यात आली आहे.

महाशीर वाचवण्यासठी असे एक नाही तर शेकडो हातांची गरज आहे. महाशीर माशाची जी बेकायदेशीरपणे मासेमारी केली जाते तीही विविध राज्यांनी रोखणं गरजेचं आहे. महाशीर वाचवणं म्हणजे नद्या वाचवणं. नद्या वाचवणं म्हणजे पर्यावरणाचा समतोल. जो समतोल जीवचक्राला जिवंत ठेवतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close