ललिता बाबर लवकरच बनणार क्लास वन ऑफिसर

August 22, 2016 7:22 PM0 commentsViews:

lalitababar

22 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी करणार्‍या ‘माण एक्स्प्रेस’ ललिता बाबरला राज्य सरकार क्लास वन अधिकारीपदी नोकरी देणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचं तसं आश्वासन दिलं आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत धडक मारलेल्या सातार्‍याची ललिता बाबर मायदेशी परतली. विमानतळावर ललिताचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ललिताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ललिताचा सत्कारही केला. ललिताने रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत धडक मारून भारतीयांच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र तिला दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

दरम्यान, राज्य सरकारने ऑलिम्पिकपूर्वीही मला मदत केली होती, तसंच आता ऑलिम्पिकनंतरही मदत करत आहेत, त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आभारी आहे, असं ललिता म्हणाली. तसंच, रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या चुका झाल्या, त्या टाळून आता 2020 मध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं लक्ष्य आहे, असंही ललिताने यावेळी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा