हसन अली प्रकरण सीआयडीकडे

April 13, 2010 6:17 PM0 commentsViews:

13 एप्रिलआज पुण्यातील घोडे व्यापारी हसन अली प्रकरणाने विधानसभेत खळबळ उडवून दिली. सुमारे 30 हजार कोटींचा कर बुडवल्याचा आरोप या हसन अलीवर आहे. आणि त्याने पोलीस चौकशीत बड्या नेत्यांची नावे घेतल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. आपण विविध विषयांसंबंधी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासोबत बैठका केल्या, अशी माहिती हसन अलीने चौकशीदरम्यान दिली, असे सांगत या चौकशीची सीडीच भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केली.मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून हसन गफूर यांची निवड करताना तत्कालीन मुख्यमंत्री तसंच आर. आर. पाटील आणि काँग्रेसचे नेतेअहमद पटेल यांच्या बैठकीदरम्यानही आपण तिथे होतो, असेही अलीने या चौकशीत सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. एवढेच नाही तर युसूफ लकडावालाच्या घरी समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाबाबतच्या बैठकीला छगन भुजबळ, अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहितीही या सीडीत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.दरम्यान या हसन अली सीडी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी विधासभेत जाहीर केले.तर भुजबळ यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत.

close