भीमरायाला देशभर आदरांजली

April 14, 2010 10:10 AM0 commentsViews: 5

14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या महामानवाला आज देशभर आदरांजली वाहिली जात आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केले. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीत बुध्द धम्माची दीक्षा घेतली होती. या ठिकाणी दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी रोखली दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न आज आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जमीन देण्याचे सरकारने कबूल केले होते. पण प्रत्यक्षात मात्र या जमिनीचा ताबा देण्यात आलेला नाही. त्याबाबतच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. फोटोबायोग्राफीचे प्रकाशनडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोबायोग्राफीचे आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रकाशन केले. बाबासाहेबांच्या 200 दुर्मिळ फोटोंचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात या बायोग्राफीच्या 5 हजार प्रती काढण्यात येणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकाची किंमत 1200 रुपये असली तरी सरकारकडून हे पुस्तक 400 रूपये या सवलतीच्या किमतीत दिले जाणार आहे.औरंगाबादमध्ये रॅलीडॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी रॅली काढली. तर भडकलगेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शेकडो अनुयायांनी गर्दी केली. शिवाय याच ठिकाणी सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.पुण्यात 14 तास व्याख्यानमालाडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त पुणे समाज कल्याण विभागाच्या वतीने सलग 14 तास व्याख्यान माला आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडत स्वानुभव कथन केले. या कार्यक्रमात समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणार्‍या अनेक योजनाची माहीतीही देण्यात येत आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम आज रात्री 9 वाजेपर्यंत चालणार आहे.

close