इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूटांचा भव्य पुतळा

August 22, 2016 8:16 PM0 commentsViews:

ambedkar210325dl0083

22 ऑगस्ट : मुंबईतील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आराखड्याला समितीने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब यांचा 350 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समितीने सोमवारी या निर्णयाला मंजूरी दिली.

इंदू मिलच्या सुमारे 12 एकर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक आंताराष्ट्रीय दर्जाचं असणार असून संसदेच्या प्रतिकृतीप्रमाणेच दिसणार आहे. त्यामुळे इंदू मिल परिसरात अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरात असणार्‍या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच पुतळा उभा राहणार आहे. याआधीच्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची ही 80 फूट इतकी होती. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ही उंची 80 फुटांवरून 350 फूट इतकी वाढवण्यात आली आहे. तसंच या स्मारकाच्या आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या आर्ट गॅलरीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कलाकृतीही ठेवल्या जाणार आहेत. या शिवाय चवदार तळ्याची प्रतिकृती, लायब्ररी आणि प्रेक्षागृहही स्मारकात असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close