सासरकडून छळ, गरोदर विवाहितेची मुलीसह आत्महत्या

August 23, 2016 2:27 PM0 commentsViews:

dowry1

23 ऑगस्ट : सासरच्या छळाला कंटाळून गरोदर विवाहितेची मुलीसह आत्महत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली. संगीता झांबरे असं या विवाहितेचं नाव असून, तिने आपल्या दोन वर्षांची मुलगी हर्षदासह विहिरीत उडी घेत अत्महत्या केली. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पठारवाडीत सोमवारी दुपारच्या सुमरास ही घटना घडली. या घटनेनंतर मुलीच्या आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, संगीताचा विवाह अकरा वर्षापुर्वी झाला होता. मात्र तीला चारही मुली झाल्यानं मुलासाठी तीचा छळ होत होता. त्यात पतीच्या अनैतिक सबंधाला विरोध केल्यानं, तिचा सासरकडून सतत छळ होत होता. या जाचाला कंटाळून संगीताने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

मायलेकींच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकांनी सासरच्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. गुन्हे दाखल करण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला मात्र पोलीसांनी पती हरिभाऊ झांबरे आणि सासू वत्सला झांबरेला अटक केल्यानं विरोध मावळला. पण पीडितेचा सासरा बापू झांबरे फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close