वालचंदच्या जमिनीवर भाजप नेत्याचा डोळा-प्रिती मेनन

August 23, 2016 4:00 PM0 commentsViews:

362096-rna-preeti-menon-aap-leader-ed

23 ऑगस्ट :  सांगलीतील वालचंद कॉलेजच्या 110 एकर जमिनीवर सांगलीचे भाजप शहर अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा डोळा असल्याचा आरोप, आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केला. पृथ्वीराज देशमुखांनी यापूर्वी गुंडगिरी करुन वालचंद कॉलेजवर ताबा मिळवला होता. आता ते सरकारला हाताशी धरुन कॉलेजवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही प्रीती मेनन यांनी म्हटलं आहे. पवारांपासून सर्वच राजकीय नेत्यांना त्यांनी टार्गेट केलं आहे.

पृथ्वीराज देशमुख बळाचा वापर करून वालचंद कॉलेजचा कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 24 मे 2016 रोजी देशमुख यांनी पुण्यात वालचंद कॉलेजच्या कार्यालयावर हल्ला करून ट्रस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी देशमुख यांच्यावर कारवाई होऊन ते आता कारागृहामध्ये असायला हवे होते. पण देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादामुळे देशमुख अजूनही मोकाट असल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केला आहे. तसंच, वालचंद कॉलेजवर प्रशासक नेमण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयातून देशमुख यांना मदत केली जात आहे. देशमुख हे आधी राष्ट्रवादीत होते, आता ते सांगलीचे भाजप शहर अध्यक्ष आहेत. भाजप हा राष्ट्रवादीच्या लोकांचा नवा मुखवटा आहे, असं ही त्या म्हणाल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा