थरूर यांना दाऊदची धमकी

April 14, 2010 10:16 AM0 commentsViews: 5

14 एप्रिलपरराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांना डी कंपनीकडून धमकी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एसएमएसव्दारे ही धमकी मिळाल्याचा दावा थरूर यांच्या सहकार्‍याने केला. त्यांनी तशा प्रकारची तक्रार गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे थरूर यांना पंतप्रधानांनी ताबडतोब बडतर्फ करावे, अशी मागणी भाजप आणि सीपीएमने केली आहे. दरम्यान थरूर यांच्या आयपीएलच्या वादाची दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग सध्या वॉशिंग्टनमध्ये आहेत. भारतात परतल्यावर या प्रकरणात लक्ष घालू आणि त्याबाबत कारवाई करू, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.मोदींनी प्रतिक्रिया टाळलीआयपीएलमध्ये सध्या वाद गाजत आहे तो ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील. कोची टीमचे काही स्टेक हे अनोळखी पार्टीकडे असल्याचा आरोप आयपीएलचे संचालक ललित मोदी यांनी केला होता. यावरूनच झालेल्या वादाला एक वेगळे वळण मिळाले. यासंदर्भात थरूर यांना एसएमएसवरून धमकी आल्याचेही सांगितले गेले. यावरच आज पत्रकार परिषदेत मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

close