नेहरू, पटेल, बोस फासावर चढले!, प्रकाश जावडेकरांची मुक्ताफळे

August 23, 2016 8:47 PM0 commentsViews:

Prakash Javadekar during a press confernce

23 ऑगस्ट :  पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यलढ्यात फासावर चढावं लागलं. ते देशासाठी शहीद झाले’, असं विधान केल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे.

छिंदवाडा इथे तिरंगा यात्रेत बोलताना जावडेकर यांनी नेहरू, सरदार पटेल आणि सुभाषबाबूंचं नाव शहीदांच्या यादीत जोडलं. जावडेकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेले क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू यांची नावे घेतली पण त्याचबरोबर नेहरू-पटेल-बोस यांची नावंही घेतल्याने सारेच अवाक् झाले.

जावडेकर नेमके काय म्हणाले…
1857 मध्ये जी लढाई सुरू झाली ती 90 वर्षे चालली. ब्रिटिशांना पिटाळून लावण्यात आलं आणि देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सर्व वीरांना माझा सलाम आहे. मी त्यांना प्रणाम करतो. किती वीर झाले… सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू हे सर्वजण देशासाठी फासावर चढले…क्रांतिवीर सावरकर आणि आणखी अनेक स्वातंत्र्यसेनांनींनी देशासाठी प्राण त्यागले, असे वक्तव्य जावडेकर यांनी केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा