तिबेट, चीनमध्ये भूकंप, 300 ठार, 8 हजार जखमी

April 14, 2010 10:22 AM0 commentsViews: 2

14 एप्रिलचीनमध्ये क्विंघाई प्रांताला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपात 300 लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर जवळपास 8 हजार लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाची तीव्रता 6.9 रिश्टर स्केल एवढी होती. तिबेट,क्वांडोपासून उत्तर पश्चिमेकडे 240 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. क्विंघाई हा तिबेट आणि झिंग झियांगमधील स्वायत्त प्रांत आहे.

close