दहिहंडी फक्त 20 फूटच, सुप्रीम कोर्टाने फेरविचार याचिका फेटाळली

August 24, 2016 2:00 PM0 commentsViews:
DAhi handi asneu
24 ऑगस्ट : दहीहंडीची उंची आणि ठरवून दिलेल्या नियमात बदल करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. जोगेश्वरीच्या जय जवान मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना निर्बंध हटवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे दहीहंडीत 18 वर्षांखालील गोविंदांना सहभागी होता येणार नाही, तसंच 20 फुटापेक्षा जास्त उंचीचे मनोरेही उभा करता येणार नाहीत.गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा अधिक असू नये; तसंच मानवी मनोरे रचताना त्यात 18 वर्षांखालील गोविंदा असू नयेत, असा आदेश दिला होता. त्याविरोधात जोगेश्वरीच्या जय जवान मंडळानं पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज (बुधवारी) सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा अधिक नकोच, असं कोर्टानं स्पष्ट केलं.

उत्सव अगदी तोंडावर, म्हणजे उद्याच असल्याने न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणं अवघड आहे. शिवाय गोविंदा पथकांनी अधिक थरांसाठी सराव केलेला आहे. महाराष्ट्राचा हा पारंपरिक उत्सव अनेक वर्षांपासून असाच सुरू असल्याने यासंदर्भातील प्रलंबित याचिकेमध्ये आम्हाला अधिक म्हणणे मांडायचे आहे. त्यामुळे तूर्तास यंदाच्या उत्सवापुरती उंची आणि वयाच्या बंधनांबाबत सवलत द्यावी, अशी विनंती ‘जय जवान’ने याचिकेत केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close