सण हे सणांसारखेच साजरे झाले पाहिजेत, राज ठाकरेंची भूमिका

August 24, 2016 8:30 PM0 commentsViews:

raj_thackery_new

24 ऑगस्ट :  दहीहंडी हा पक्षाचा नव्हे, तर सणाचा विषय असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या निर्णयावरून राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्टावर निशाणा साधला. दहीहंडीच्या पूर्वसंध्येला सण सणासारखा साजरा झाला पाहिजे, या शब्दांत राज यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं. तंसच, प्रत्येक गोष्ट आता न्यायालय ठरवणार का असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी आज (बुधवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारला आहे.

दहीहंडी थराने नाही तर आता मिसाइलने फोडायची का? असा उपहासात्मक टोलाही यावेळी राज यांनी लगावला. हा उत्सव साजरा करताना धागडधिंगा होता कामा नये, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं. दहीहंडी फोडताना अपघात होण्याची जास्त शक्यता असते. यावर सलामी देऊन हंडी खाली उतरवून फोडण्याचा मार्ग निघू शकतो. त्यामुळे थर लावू नयेत हा निर्णय योग्य मानता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. तंसचं, कोर्टानं 20 फुटांची अट घालण्यापेक्षा सुरक्षेचे नियम का नाही घालून दिले, असा सवाल राज यांनी केला. न्यायालयांमध्ये इतके प्रश्न प्रलंबित आहेत. न्यायालयानं त्यावर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी कोर्टाला दिला आहे. त्यामुळे आता दहीहंडीच्या दिवशी मनसे नेमकी काय भूमिका काय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा