मंत्रालयाबाहेर आंदोलन करणार्‍या ‘रहेजा’च्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

August 24, 2016 10:06 PM0 commentsViews:

24 ऑगस्ट :  मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी आज (बुधवारी) मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला.

êÖêËáÖ¸üÖêê

रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फाऊंडेशन आणि एलिमेंट्री प्रवेशासाठी 5400 रुपयांऐवजी दहा हजार रुपये फी घेतली, ती परत करावी आणि संस्थेचा कारभार नीट चालण्यासाठी प्रसाशकीय अधिकारी नेमावा, या मागण्यांसाठी रहेजा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंत्रालयाबाहेर आज आंदोलन केलं.

गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा मागणी करुनही कारवाई होत नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट मंत्रालयावर धडक देत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

आंदोलनादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी सुमारे 100 विद्यार्थ्यांनी ताब्यात घेतलं. तर काही महिला पोलिसांनी विद्यार्थीनींना त्यांचे केस धरून मारहाण केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा