राहुल यांची मायावतींवर टीका

April 14, 2010 11:21 AM0 commentsViews: 5

14 एप्रिलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनीच उत्तरप्रदेशात दलित मतांचे राजकारण सुरू झाले आहे. आंबेडकरनगरमध्ये राहुल गांधी आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी एकाच ठिकाणी सभा घेतली. राहुल गांधी यांनी या वेळी मायावतींवर कडाडून हल्ला केला. मायावतींना राज्याचा विकास नको आहे. दिल्लीहून राज्याला पैसे मिळतात, मात्र ते पैसे जातात कुठे? असा प्रश्न राहुल यांनी विचारला. उत्तर प्रदेशात विकासाचे नाही तर फक्त जातीचे राजकारण चालते, अशी टीकाही राहुल यांनी यावेळी केली.

close