ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली, मनसेची ‘कायदाभंग’ दहिहंडी

August 25, 2016 4:01 PM0 commentsViews:

25êË×Ûúê

25 ऑगस्ट :  सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाला न जुमानता मनसेने ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल 40 फुटांवर दहीहंडी बांधली आहे. या दहीहंडीला कायदेभंग दहीहंडी असे नाव देऊन मनसेने न्यायालयाच्या निर्णयाला पुन्हा एकदा जाहीरपणे आव्हान दिले आहे. तसंच, 9 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडून 11 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस आता याबाबत काय कारवाई करणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

सध्या या दहीहंडीच्याठिकाणी गणवेशातील आणि साध्या वेषातील पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसंच पोलिसांकडून वेळ पडल्यास न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी या दहीहंडीच्या ठिकाणाची व्हिडिओग्राफी केली जात आहे. आज दहीहंडीची व्हिडिओग्राफी होणार असून पोलिस उद्या कारवाई करायची की नाही यासंदर्भात निर्णय घेतील.

दरम्यान, दहीहंडीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 20 फुटांच्या उंचीची घालून देण्यात आलेल्या मर्यादेचे गोविंदा मंडळांकडून उल्लंघन होण्याचीच शक्यता जास्त आहे. डोंबिवलीतही एका मंडळाकडून दहीहंडी फोडण्यासाठी पाच थर रचून या कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा