रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह 10 किमीवर नेऊन पायपीट

August 25, 2016 1:08 PM0 commentsViews:

Dead wife on shoulders25 ऑगस्ट : ओडिशातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध न झाल्याने शेवटी त्याने स्वतः आपल्या पत्नीचा मृतदेह तब्बल 10 किमीवर चालत नेत घरी नेला. हा प्रकार ओडिशातील कालाहंडी जिह्यात घडला. या घटनेमुळे सगळीकडेच खळबळ माजली आहे.

कालाहंडी जिह्यातील दाना माझी या आदिवासी व्यक्तीच्या पत्नीचा टीबीमुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू पावलेल्या पत्नीचे मृतदेह नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती ना कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.

त्याला आपल्या पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरी नेणे गरजेचे होते. त्याने रुग्णवाहिकेची बराच वेळ वाट पाहिली. मात्र, रुग्णवाहिका आली नाही. अखेर रुग्णवाहिका येत नसल्याचे लक्षात येता त्याने मृतदेह खांद्यावरुनच जवळपास 10 किमी अंतरावर नेण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत त्याची 12 वर्षीय मुलगीही होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा