डॉ. एस अहमद 30 वर्षांपासून साजरा करतायेत कृष्णजन्मोत्सव

August 25, 2016 3:59 PM0 commentsViews:

25 ऑगस्ट :  जन्माष्टमीचा सगळीकडेच उत्साह आहे. हा हिंदूंचा सण आहे असं राजकीय नेते सांगत असले तरी धर्माच्या पलिकडे जाऊन कानपूरमध्ये डॉ. एस. अहमद हे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीसह जन्माष्टमी साजरी केली आहे.

शहरातील डॉ. अहमद हे गेल्या 30 वर्षांपासून श्‌्ा्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करतात.  महत्वाची गोष्ट म्हणजे अहमद यांच्या परिवारातले सर्व सदस्य या सोहळ्यात सहभागी होतात. श्‌्ा्रीकृष्णाच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यापासून त्याच्या आरतीपर्यंत सर्व कामं अहमद आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या भक्तीभावाने करतात. उल्लेखनीय बाब म्हणजे हिंदू आणि मुस्लीम एकत्र येऊन हा सण साजरा करतात.  माणुसकीशिवाय कोणताही धर्म मोठा नसल्याचं अहमद यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अहमद यांचा घालून दिलेल्या या आदर्शामुळे भारतातील सण आणि उत्सव हे धार्मिक सलोख्याचा संदेश घेऊन येतात ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा