सांस्कृतिक संस्थेत जुगार

April 14, 2010 11:34 AM0 commentsViews: 40

14 एप्रिलक्रीडा आणि सांस्कृतिक संस्थेच्या नावाखाली जळगावात राजरोस चालणार्‍या तीन पत्त्यांचा जुगार अड्‌ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. पोलीस अधिक्षक संतोष रस्तोगी यांनी हे छापे घातले. विशेष म्हणजे या छाप्यांची खबर स्थानिक पोलिसांना नव्हती. शहरातील भरवस्तीत हे जुगाराचे अड्डे सुरू होते. याबाबत अनेकवेळा नागरिकांनी तक्रार केली होती. पण पोलिसांनी नेहमी याकडे दुर्लक्ष केले होते. या अड्‌ड्यांवर पत्ते, दारुच्या बाटल्या आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे, साहित्य, तसेच एक लाखाची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.

close