सीसीटीव्ही : माता न तू वैरिणी, बरेलीमध्ये चिमुकल्याला आईची बेदम मारहाण

August 26, 2016 5:43 PM0 commentsViews:

26 ऑगस्ट : आई पोटच्या मुलाशी किती क्रूरपणं वागू शकते याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये एक आई आपल्या दीड वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करत असतानाचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

Öê˯Ö

दीड वर्षाच्या या बाळाचं नाव वेदांत चर्तुवेदी असं आहे. बरेलीतील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या दीपक चतुर्वेदी यांनी चार वर्षापूर्वी पूनमसोबत लग्न केलं. दीड वर्षांपूर्वी वेदांतचा जन्म झाला. वेदांतचे वडील दीपक चर्तुवेदी यांनी त्यांची बायको पूनमवर निर्दयीपणे आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप केलाय.

सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत, दीपक यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारदेखील केली आहे. दरम्यान नवऱ्यानेच वेडं होण्याचं औषध दिल्यामुळे हे कृत्य केल्याचा खुलासा वेदांतला चोप देण्याऱ्या महिलेने केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा