कोपर्डीप्रकरणाच्या निषेधार्थ उस्मानाबादमध्ये मूकमोर्चा

August 26, 2016 8:59 PM0 commentsViews:

¿Ö¦üß´Ö¯ÖÖê243

26 ऑगस्ट : कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी उस्मानाबादमध्ये आज (शुक्रवारी) मराठा समाजाने मूकमोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी शहरातील जिजाऊ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेन हा मूकमोर्चा काढण्यात आला.

मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या या मोर्चात डॉक्टर आणि शिक्षकांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी  सहभाग घेतला. मोर्चात महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणिय होती. एकून 5 लाखाहून अधिक लोकं उस्मानाबादच्या मोर्चात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, मोर्चातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून उस्मानाबादमध्ये 800 पोलिसांसह केंद्रीय पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा