मध्य रेल्वेची वाहतूक हळहळू पूर्वपदावर, दुरूस्तीचं काम पूर्ण

August 26, 2016 9:45 PM0 commentsViews:

railway problem26 ऑगस्ट : मध्य रेल्वे मार्गावरील दोन तासापासून विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दादर-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला गेलेले तडे  दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असलं तरी सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.

दादर-माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे सीएसटीवरुन- कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला असून भायखळ्याहून जलद मार्गावरील  वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली.

या खोळंब्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झालं. मध्य रेल्वेच्या सर्व स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान बिघाड दुरुस्त झाला असला तरी वाहतूक मात्र उशिराने सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा