नांदेडमध्ये तीन बिबट्यांचा मृत्यू

April 14, 2010 11:46 AM0 commentsViews: 1

14 एप्रिलनांदेड मधील माहूर वन परिक्षेत्रातील पाचुंदा गावातील धानोरा शिवारात तीन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यात दोन नर आणि एका मादीचा समावेश आहे. सागवान तस्करांनी विषप्रयोगातून हा प्रकार घडवून आणल्याचा गावकर्‍यांचा संशय आहे. तर या बिबट्यांचा मृत्यू पाण्याअभावी झाल्याची सारवासाराव वनविभाग करत आहे. या बिबट्यांनी सोमवारी एका गायीची शिकार केली होती. खाऊन उरलेल्या शिकारीवरच विष टाकले गेले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. बिबट्यांचे मृतदेह आढळल्यानंतर वनविभागाने घाईघाईने त्यांचे दहन केले.

close