पुढच्या तीन ऑलिम्पिकसाठी ‘टास्क फोर्स’ – नरेंद्र मोदी

August 27, 2016 2:41 PM0 commentsViews:

prime-minister-narendra-modi-and-minister-of-state-for-youth-affairs-and-sports-jitendra-singh-in-a-group-photograph-with-the-indian-contingent-14676314978284

27 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये केवळ दोनच पदकांवर भारताला समाधान मानावं लागल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी तीन ऑलिम्पिकसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसंच 2020, 2024 आणि 2028 या तीन ऑलिम्पिक स्पर्धांच्या नियोजनबद्ध तयारीच्या दृष्टीने एका टास्क फोर्स स्थापना करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वांत जास्त खेळाडू भारतातून पाठवण्यात आले होते. तरीही दोनच पदक भारताने आपल्या खिशात घातले. तसंच भारतात योग्य सोई सुविधा नसल्याचा आरोप खेळाडूंनी केला होता. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धांसाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचं निश्चित केलं आहे. खेळाडूंना नेमक्या कोणत्या सुविधा द्यायला हव्यात, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था कशी करता येईल, निवड प्रक्रियेत कोणत्या त्रुटी आहेत यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत हा टास्क फोर्स कृती आराखडा तयार करणार आहे. त्या आधारे सरकार क्रीडा धोरणात बदल करू शकेल. त्यामुळे आगामी काळात खेळांसाठी नक्कीच अच्छे दिन येतील, असा दावा मोदींनी केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या या घोषणेचं क्रीडाक्षेत्रातून स्वागत होतंय. ऑलिम्पिक जवळ आल्यानंतर जागे होणारे आपण पुढच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धांची तयारी आत्तापासून करणार असू तर ते निश्चितच सुखावह असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. अर्थात, टास्क फोर्स नेमकं काय सांगतो आणि सरकार त्यावर काय करतं, यावरच सगळं अवलंबून असेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा