‘जय’चा तपास सीआयडीकडे : मुख्यमंत्री

August 27, 2016 3:09 PM0 commentsViews:

22FL_sanctuaries_J_2036454g

27 ऑगस्ट :  आशियातला सर्वांत मोठा वाघ ‘जय’ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून, त्याचा तपास आता  सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हाड अभयारण्यातला ‘जय’ वाघ गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहे. जयच्या शोधासाठी 100 हून अधिक स्वयंसेवक आणि पोलिसांनी मोहीम राबविली होती. मात्र, हाती काहीच न लागल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत केस  सीआयडीकडे सोपवण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघाचा तपास  सीआयडीकडे सोपवला आहे.

दरम्यान, जयच्या हत्येच्या संशयावरून वनाधिकाऱ्यांकडून भंडारा जिह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा