कल्याणमध्ये फेरीवाल्यांकडून महिला पोलिसाला बेदम मारहाण

August 27, 2016 6:36 PM0 commentsViews:

Kalyan13

27 ऑगस्ट :  कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर पथारी पसरणाऱ्या फेरीवाल्यांना पोलिसांचीही भीती राहिलेली नाही. फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या महिला आरपीएफला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून या प्रकरणी जीआरपीने दोन आरोपींना अटक केली आहे.

प्रतिभा साळुंखे असं मारहाण झालेल्या महिला आरपीएफचं नाव आहे. साळुंखे कल्याणमधील फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. त्यावेळी फेरीवाले आणि महिला पोलिसात वाद झाला आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दुर्गा तिवारी आणि सुभम मिश्‌्ा्रा अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत.

दरम्यान, पोलिसच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचं काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा