कंपनी वाचवण्याकरता नोकर कपातीचा निर्णय – जेट एअरवेज

October 15, 2008 5:06 PM0 commentsViews: 10

15 ऑक्टोंबर, मुंबईखर्च कपातीच्या नावाखाली जेट एअरवेज कंपनीनं 1900 कर्मचार्‍यांची अचानक कपात केली. या निर्णयामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. याबाबत कंपनीनं स्पष्टीकरण दिलं आहे. ' कंपनी वाचवण्याकरता हा निर्णय घेतला आहे. पुढे कंपनीची आथिर्क स्थिती सुधारल्यास कर्मचार्‍यांना कदाचित पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे. एकूण 13 हजार कर्मचार्‍यांपैकी केवळ 1900 जणांना काढुन टाकण्यात आलं आहे. त्यांना कॉन्ट्रक्टप्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे. कर्मचार्‍यांना काढुन टाकण्याचा निर्णय किंगफिशरबरोबर झालेल्या कराराशी काही संबंध नाही. आम्ही कर्मचार्‍यांना तातडीनं कामावर घेण्याचा प्रयत्न करू ', असं कंपनीनं पत्रकार परिषदेत सांगितलं.

close