राज यांची भूमिका म्हणजे ‘तुम लढो हम कपडे संभालते हैं’ – राणे

August 27, 2016 8:21 PM0 commentsViews:

rane_raj23

27 ऑगस्ट :   तुम लडो हम कपडे संभालते हैं, अशी राज यांची भूमिका असल्याचं सांगत काँग्रेस नेते नारायण राणेंनी आज (शनिवारी)  दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर सडकून टीका केली.

भ्रष्टाचार, कांदाप्रश्नी गणेशोत्सवानंतर सरकारविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशाराही राणे यांनी आज दिला. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तुम लढो हम कपडे संभालते है, अशी त्यांची नीती आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली, तर सामान्य कार्यकर्त्यांवरच केसेस होणार, यांचं काय जातंय आवाहन करायला, असा टोलाही त्यांनी राज यांना लगावला. तसंच नवीन नियम बनवण्यासाठी सरकारवर दबाव का टाकला नाही, असा सवालही राणेंनी केला. कोर्टाशी न भांडता राज यांनी सरकारशी भांडायला हवं, असंही ते म्हणाले.

त्याचबरोबर, शेतमालाला भाव मिळण्यापासून ते गैरव्यवहारापर्यंत अनेक मुद्दयांवर अधिवेशनात आपण आवाज उठवला. आता गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरू, असं ही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा