खंडणीसाठी डॉक्टरवर हल्ला

April 14, 2010 12:02 PM0 commentsViews: 5

14 एप्रिलकोल्हापुरातील डॉ. प्रमिला पाटील यांच्यावर खंडणीसाठी एका गुंडाने आज प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी डॉ. प्रमिला पाटील यांच्याकडून चंद्रकांत उर्फ बबन पाटील या गुंडाने खंडणी मागितली होती. पण प्रमिला यांनी खंडणी द्यायला नकार दिल्याने या गुंडाने त्यांच्या घरावर आणि वाहनांवर हल्ला चढवला होता. त्या प्रकरणात तो गेली सहा महिने शिक्षा भोगत होता. आज पॅरोलवर सुटून बाहेर आल्यावर त्याने प्रमिला पाटील यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. प्रमिला पाटील यांच्या उपचार सुरू आहेत. तर गुंड पाटील याला शहापुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

close