रिलायन्स फाऊंडेशनचा नवा उपक्रम, 2 हजार शाळा-कॉलेजेस खेळणार फुटबॉल मॅच

August 27, 2016 6:25 PM0 commentsViews:

27 ऑगस्ट :  रिलायंस फाऊंडेशनतर्फे आज (शनिवारी) मुंबईतील बीकेसीमध्ये ‘युथ स्पोर्ट्स’ या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली. बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूर नीता अंबानी यांच्या उपस्थीतीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तळागळातील मुलांमध्ये खेळाला चालना मिळावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

युथ स्पोर्ट्स अंतर्गत पहिल्या वर्षी 2 हजार शाळा आणि कॉलेजच्या 2 हजार 200 टीम्समध्ये फुटबॉलची मॅच खेळवली जाणार आहे. तर पुढच्या वर्षी आणखी दोन खेळांचा यात समावेश करण्यात येणार आहे. मुंबईसह दिल्ली, गुवाहाटी, कोची, गोवा, चेन्नई, पुणे, कोलकाता या शहरातील विद्याथ्यांर्मध्ये ही स्पर्धा होईल आणि पुढच्या वर्षी आणखी 8 अशा 16 शहरांचा यात समावेश करण्यात येईल.

दरम्यान, यानिमित्तानं एचआर आणि विल्सन कॉलेजच्या मुलींमध्ये फुटबॉल मॅच रंगली. ज्यात एचआर कॉलेजच्या मुलींनी बाजी मारली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा